आईस्क्रीममध्ये सापडलेलं ते बोट कुणाचं? DNA टेस्टमध्ये धक्कादायक उलगडा whos finger was in ice cream dna report reveals fir against pune company – News18 मराठी

Share this post

मुंबई : आईस्क्रीममध्ये माणसाचं तुटलेलं बोट सापडल्यामुळे खळबळ माजली होती. याप्रकरणी आता आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या व्यक्तीचा अंगठा आईस्क्रीममध्ये होता, त्याबाबत पोलीस तपासात उलगडा झाला आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणात फॉर्च्युन कंपनीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. डीएनए रिपोर्टमध्ये हा अंगठा कुणाचा आहे? याबाबतचा खुलासा झाला आहे.

आईस्क्रीममध्ये मिळालेलं बोट पुण्याच्या फॉर्च्युन कंपनीमध्ये काम करणारा असिस्टंट ऑपरेटर मॅनेजर ओमकार पोटेचं आहे. डीएनए रिपोर्टमध्ये हे बोट ओमकार पोटेचं असल्याचं स्पष्ट झालं आहे. 11 मे 2024 ला आईस्क्रीम पॅक करताना ओमकार पोटेच्या उजव्या हाताचं बोट कापलं गेलं होतं आणि हे बोट आईस्क्रीममध्ये पडलं. धक्कादायक बाब म्हणजे स्पॉट मॉनिटरिंग न करता आईस्क्रीम पॅक केलं गेलं.

आईस्क्रीमवर असलेली मॅन्युफॅक्चरिंग डेटही त्याच दिवसाची आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी फॉर्च्युन कंपनीविरुद्ध बेजबाबदारपणाचा गुन्हाही दाखल केला आहे. यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांवर अटकेची टांगती तलवार आहे.

कोण आहे ओमकार पोटे?

ओमकार पोटे पुण्याच्या इंदापूरमध्ये फॉर्च्युन डेअरीमध्ये काम करतो. ओमकार पोटे हा 24 वर्षांचा युवक आहे. मालाड पोलिसांनी ओमकार पोटेचं ब्लड सॅम्पल सांताक्रुज फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासासाठी पाठवलं होतं.

ओमकार पोटे पुण्याच्या फॉर्च्युन डेअरीमध्ये एप्रिल 2024 पासून असिस्टंट पॅकिंग मॅनेजर म्हणून जॉईन झाला होता. इंदापूरच्या फॉर्च्युन डेअरीमध्ये 11 मे 2024 च्या सकाळी ओमकार पोटे पॅकिंग विभागात आईस्क्रीमचं पॅकिंग करत होता त्याचवेळी त्याच्या बोटाचा वरचा भाग तुटला. ओमकार पोटेचं बोट तुटल्यानंतर कंपनीने त्याच्यावर उपचारही केले, पण तुटलेल्या बोटाचा शोध घेतला गेला नाही.

ऑनलाईन मागवलं होतं आईस्क्रीम

मुंबईच्या मालाड भागातल्या एका युवकाला आईस्क्रीम खाताना माणसाच्या अंगठ्याचा तुकडा मिळाला. यानंतर युवकाने मालाड पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याबाबत तक्रार दाखल केली. युवकाने हे आईस्क्रीम डिलिव्हरी ऍप झेप्टोवरून मागवलं होतं.

ज्या आईस्क्रीममध्ये माणसाचं बोट मिळालं ते यम्मो ब्रॅण्डचं आईस्क्रीम होतं. या कंपनीची सुरूवात 2012 साली झाली. युम्मो आईस्क्रीमची सहस्थापना वॉको फूड कंपनीद्वारा केली गेली. कंपनीचे फ्रोजन डेजर्ट आणि इतर खाद्यपदार्थांचे ब्रॅण्डही आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.

Source link

News97 India
Author: News97 India

Leave a Comment

ख़ास ख़बरें

ताजातरीन

marketmystique