संबंधित बातम्या
नारायण काळे, प्रतिनिधी
पुणे : दौंड ते मनमाड दरम्यान रेल्वेच्या दुहेरीकरणाचं काम सुरू असल्यानं दक्षिण मध्य रेल्वेच्या काही गाड्यांचे मार्ग बदलले असून काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मध्य रेल्वे पुणे विभागातील दौंड आणि मनमाड विभागाच्या पुणतांबा आणि कान्हेगाव रेल्वे स्थानकादरम्यान दुहेरीकरणाच्या कामासाठी ट्रॅफिक आणि पॉव्हर ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे दक्षिण-मध्य रेल्वेच्या काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असून काही गाड्या अंशतः रद्द केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी, जेणेकरून प्रवासात कोणताही त्रास होणार नाही.
हेही वाचा :
Pune: 17 ते 28 जूनदरम्यान ब्लॉकमुळे रेल्वे रद्द, कोणत्या गाड्यांवर परिणाम? एका क्लिकवर!
खालील गाड्यांच्या मार्गात बदल :
- दौंड – निजामाबाद डेमु गाडी 26, 27, 28, 29 आणि 30 जून 2024 पर्यंत कुरडूवाडी, लातूर, परळी, परभणी मार्गे धावेल.
- निजामाबाद – पुणे डेमू ही गाडी 25, 26, 27, 28 आणि 29 जून 2024 पर्यंत परभणी, परळी, लातूर, कुरडूवाडी मार्गे धावेल.
- पुणे – नांदेड एक्सप्रेस 25, 26, 27, 28 आणि 29 जून 2024 पर्यंत दौंड, कुरडूवाडी, लातूर, परळी, परभणी मार्गे धावेल.
- नांदेड – पुणे एक्सप्रेस ही गाडी 26, 27, 28, 29 आणि 30 जून 2024 पर्यंत परभणी, परळी, लातूर, कुरडूवाडी, दौंड मार्गे धावेल.
अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या :
- सिकंदराबाद – श्री साईनगर शिर्डी एक्सप्रेस 28 जून 2024 रोजी मनमाड ते श्री साईनगर शिर्डी दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली असून ही गाडी सिकंदराबाद ते मनमाड अशी धावेल.
- श्री साईनगर शिर्डी – सिकंदराबाद एक्सप्रेस 29 जून 2024 रोजी श्री साईनगर शिर्डी ते मनमाड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली असून ही गाडी मनमाड ते सिकंदराबाद अशी धावेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.
- First Published :
