पिंपरी-चिंचवड परिसरात मजुरांना काम मिळंना; उपाशी राहायची वेळ!

Share this post

प्राची केदारी, प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड : कामाच्या शोधात अनेकजण स्थलांतर करतात. अनेक मजूर मिळेल ते काम करून आपलं कुटुंब चालवतात. पिंपरी-चिंचवड भागातील डांगे चौकात दररोज 500 ते 1000 मजूर कामाच्या शोधात येतात. सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत काहीना काहीतरी
काम
नक्कीच मिळेल या आशेवर इथंच थांबतात. परंतु सध्या अशी परिस्थिती आहे की, त्यांना प्रचंड हाल सोसावे लागताहेत. त्यांच्या हाताला काहीच काम मिळत नाहीये.

गेली अनेक वर्षे इथं गावागावातून मजूर कामाच्या शोधात येतात. कधीकधी काम मिळत नाही म्हणून दिवस दिवसभर बसून राहतात. यात शिकलेला वर्गही मोठा असतो, तेसुद्धा मिळेल ते काम करतात.

हेही वाचा :
शेतकऱ्यानं लढवली शक्कल, घेतलं ‘या’ भाज्यांचं उत्पादन; आज उलाढाल लाखोंची!

ते सांगतात, ‘दररोज काम मिळत नाही. रोजगार हमीचे फॉर्म भरले त्यातूनही लाभ मिळत नाही. यामुळे उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण होतो. भाडं भरायचं असतं. आम्ही उत्साहानं इथं येतो पण कधीकधी परत जायलाही पैसे नसतात. त्या दिवसाची मजुरी वाया गेल्यानं अक्षरशः उपाशी राहण्याची वेळ येते. कधी जर 1000 रुपये मिळालेच तर सगळंकाही भागवून फक्त 200 रुपये शिल्लक राहतात’, अशी वेदना इथल्या मजुरांनी व्यक्त केली.

विशेष म्हणजे या मजूर वर्गात पुरुषांसह महिलादेखील असतात. साधारण 30 ते 75 वयोगटातील व्यक्ती इथं कामाच्या शोधात येतात. तसंच केवळ एका ठिकाणी नाही, तर पुण्यात जवळपास 4 ते 5 ठिकाणी अशाप्रकारे मजूर जमतात आणि काम शोधतात. परंतु सगळीकडेच सध्या काम मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे त्यांना हाल सहन करावे लागतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.

Source link

News97 India
Author: News97 India

Leave a Comment

ख़ास ख़बरें

ताजातरीन

marketmystique