भाजप पदाधिकाऱ्याची खदखद, अजितदादा ऍक्शन मोडमध्ये, थेट पुण्यात फोन केला अन्… ajit pawar in action mode after bjp supporter unhappy with ncp in government – News18 मराठी

Share this post

चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी
पुणे : भाजप आमदार राहुल कुल यांच्यासमोरच भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष आणि पुणे बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी शिरूर लोकसभा आढावा बैठकीमध्ये त्यांची खदखद बोलून दाखवली. अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा, अजित पवारांनी भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे. अजित पवार सत्तेत असतील तर आम्हाला सत्ता नको, पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार आमच्या बोकांडी आले, अशी टीका सुदर्शन चौधरी यांनी केली.

पुणे जिल्हा भाजप पदाधिकाऱ्यांनी केलेल्या या वक्तव्याची माहिती अजित पवारांनीही घेतली आहे. नेमक्या नाराजीचं कारण काय? याबाबत अजित पवारांनी जाणून घेतलं. तसंच विनाकारण युतीत वाद नको, अशी भूमिका अजित पवारांनी घेतली. तसंच पुणे जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी बैठकीला जे उपस्थित होते, त्यांच्याकडून अजित पवारांनी माहिती घेतली.

‘राष्ट्रवादीमुळे आमचं वाटोळं झालं’, भाजप आमदार भडकला; मिटकरी-चव्हाणांची ‘लायकी’ काढली!

सुदर्शन चौधरी बॅकफुटवर

दरम्यान या वादानंतर सुदर्शन चौधरी बॅकफुटवर आल्याचं पाहायला मिळत आहे. ‘या माझ्या व्यक्तीगत भावना आहेत. मी अजित पवारांबद्दल चुकीचं वक्तव्य केलेलं नाही. माझ्या वक्तव्यामुळे अजितदादांच्या किंवा तुमच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, ते माझं वैयक्तिक मत होतं’, असं सुदर्शन चौधरी म्हणाले.

राष्ट्रवादीचं आंदोलन

सुदर्शन चौधरी यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. सुदर्शन चौधरी यांच्या पुणे बाजार समिती कार्यालयात शिरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. सुदर्शन चौधरी यांच्या तोंडाला काळं फासणार, असा इशाराही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला.

ठाकरे-फडणवीसांचा एकाच लिफ्टने प्रवास, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.

Source link

News97 India
Author: News97 India

Leave a Comment

ख़ास ख़बरें

ताजातरीन

marketmystique