प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : शेतात आता शेतकरी नवनवीन प्रयोग करत आहेत. त्या माध्यमातून ते आता चांगले उत्पन्नही घेत आहेत. त्याचप्रमाणे एका शेतकऱ्याने आपल्या 9 एकर शेतीत ऑर्किड फुलांची शेती केली आहे. आज जाणून घेऊयात, ही विशेष कहाणी.
रामचंद्र रघुनाथ सावे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते पालघर जिल्ह्यातील डहाणु तालुक्यातील चिंचणी गावातील रहिवासी आहे. त्यांनी प्रसिध्द फुल शेतीतज्ञ आणि पुण्यातील राईज अँन शाईनच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. भाग्यश्री पाटील यांच्या मदतीने आपल्या नऊ एकर शेतात ऑर्किड फुलांची शेती केली आहे.
जिद्द, चिकाटीच्या जोरावर तरुणाने उभारला फॅब्रिकेशनचा उद्योग, सोलापूरच्या रहिमानची प्रेरणादायी गोष्ट!
1 एकरापासून ते 9 एकरांपर्यंत –
रामचंद्र सावे हे पूर्वीपासूनच पारंपरिक भाजीपाल्याची शेती करत होते. परंतु त्यामध्ये तेवढं उत्त्पन्न होत नव्हतं. तर कधी कधी वातावरणातील बदलामुळे नुकसानही होत होतं. तेव्हा त्यांना शेताकडे येत असताना नैसर्गिक आर्किड दिसले आणि त्यांनी याची शेती करण्याचा विचार केला. त्यानंतर त्याचे प्रशिक्षण घेत त्यांनी आर्किडच्या शेतीला सुरुवात केली. यामध्ये एक एकरात लागवड केल्यानंतर त्यामधून चांगले उत्पन्न मिळालं. मग पुढे त्यांनी 2 एकरात त्याची लागवड केली. यासाठी 70 लाख रुपये इतका खर्च झाला. मग पुढे यामधून मिळणाऱ्या पैशातून अजून वाढवत आता 9 एकरात त्याची लागवड केली आहे.
एक व्यक्ती एक एकर सांभाळू शकतो. आर्किड हा असा प्रोजेक्ट आहे की, जो तरुण वर्गाने केला पाहिजे. यामधून 5 ते 6 वर्ष उत्पन्न हे घेऊन चांगला नफाही मिळवू शकता. शेडनेटमध्ये ही फुलांची शेती केली आहे. आता या ऑर्किडला बाजारात चांगली मागणी मिळत आहे, अशी माहिती रामचंद्र सावे यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.